शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप चालकाची ४ लाखांची रोकड पकडली

By admin | Updated: October 13, 2014 01:35 IST

अकोल्यात निवडणुक पथकाने रोकड पकडली; मात्र रक्कम रोख पेट्रोल विक्रीची.

अकोला: निवडणूक विभागाच्या स्टॅटेस्टिक सर्व्हेलन्स पथकाने रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कृषी विद्यापीठासमोरील जकात नाक्यावर पेट्रोलपंप मालकाच्या कारमधून ४ लाख २७ हजार ५00 रुपयांची रोख पकडली; परंतु ही रोख पेट्रोल विक्रीची असल्याचे स्पष्ट झाले. सध्या ही रोख तात्पुरती सिव्हिल लाईन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. आळशी प्लॉटमध्ये राहणारे नरेश. रा. अग्रवाल यांचा शिवणी येथे पेट्रोलपंप आहे. रविवारी दुपारी ते पेट्रोलपंपावर गोळा झालेली ४ लाख २७ हजार ५00 रुपयांची रोख घेऊन त्यांच्या एमएच ३0 एल ८0९५ क्रमांकाच्या इंडिका कारने घराकडे येत होते. दरम्यान, त्यांची कार निवडणूक विभागाच्या स्टॅटेस्टिक सर्व्हेलन्स पथकाचे प्रमुख व पंचायत समितीतील विस्तार अधिकारी रमेश केशवराव देशमुख यांनी जकात नाक्यावर अडविली आणि कारची तपासणी केली. तपासणीमध्ये रोकड मिळून आली. या ठिकाणी अग्रवाल यांनी ही रोख पेट्रोल विक्रीची असून, त्याचा हिशेबही पेट्रोलपंपावर असल्याचे सांगितले; परंतु देशमुख यांनी त्यांचे काहीएक ऐकून न घेता त्यांना थेट सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात आणले आणि ही रोकड निवडणूकसंबंधी आणली असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून, पेट्रोल विक्रीचा हिशेबाची कागदपत्रे दिल्यानंतर रोख ताब्यात देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.*भरारी पथकांच्या आततायीमुळे व्यापारी त्रस्तशहरातील चेकपोस्टवर तैनात करण्यात आलेल्या निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईला व्यापारी त्रस्त झाले आहेत. एमआयडीसी परिसरात अनेक उद्योग असल्याने, लाखो रुपयांची रोख घेऊन व्यापारी शहराबाहेर किंवा शहराच्या आत येतात. भरारी पथके व्यापार्‍यांच्या कार अडवून तपासणी करतात. व्यापारी रोखचा हिशेब दाखविण्यास तयार असतानाही पथकातील अधिकारी रोख पकडल्याच्या तोर्‍यात वावरून व्यापार्‍यांना नाहक त्रास देत असल्याच्या घटना घडत आहेत.