शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यू : जनतेने नाकारला..व्यापाऱ्यांनी गुंडाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 12:29 IST

जनतेनेच जनता कर्फ्यू नाकारल्याचे चित्र पहिल्याच दिवशी दृष्टीस आले.

अकोला : विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स अकोल्याच्या पुढाकाराने व सर्व व्यापारी संघटनांच्या एकमताने २५ ते २९ पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली असली तरी किरकोळ दुकानांसह गल्लीबोळातील विविध प्रतिष्ठाने सर्रास सुरू होती. रस्त्यावरची वर्दळ कायमच होती. त्यामुळे जनतेनेच जनता कर्फ्यू नाकारल्याचे चित्र पहिल्याच दिवशी दृष्टीस आले. त्यामुळे विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सने रात्री उशीरा पत्रक काढून हा जनता कर्फ्यू मागे घेत असल्याचे जाहीर केले. जनता कर्फ्यूसंदर्भात राजकीय पक्ष, लहान व्यापारी यांची नकारात्मक भूमिका असल्याने जनता कर्फ्यूचे स्वरूप कसे राहील, याबाबत संभ्रम होताच. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला.सराफा बाजार, दाणा बाजार, न्यू क्लाथ मार्केट, जुना भाजी बाजार बंद होता; मात्र गांधी रोड, टिळक रोड, डाबकी रोड, उमरी रोड, जठारपेठ चौक, नेकलेस रोड, गोरक्षण रोड, मोहम्मद अली रोडवरील अनेक प्रतिष्ठाने सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतील वर्दळ मंदावल्याचे चित्र नव्हते. टिळक रोड, ताजनापेठ, गांधी रोड, रेल्वे स्टेशन मार्गासह बसस्थानकावरही नागरिकांची गर्दी दिसून आली. नाभिक समाजाचेही प्रतिष्ठाने सुरू होती. पेट्रोल पंप, दारूची दुकाने नेहमीप्रमाणेच सुरू होती.

या परिसरातील दुकाने सुरूच!एमआयडीसी परिसरातील कारखाने, रिक्षा, बस, पानपट्टी, चहाची हॉटेल्स, अनेक लहान-मोठी कापड व जनरल स्टोअर्स सुरू होती. गांधी रोडवर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते फतेह चौकदरम्यान अर्ध्यापेक्षा जास्त दुकाने सुरूच होती. मो. अली रोड व सुभाष रोडवर जनता कर्फ्यूचा लवलेशही नव्हता. भाजी बाजारात रात्री आलेल्या मालाची हरासी रात्रीच झाली; मात्र सकाळी जनता बाजारात फळांचा लिलावही झाला.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक