मूग, उडिदाचा पेरा घटणार; कापसाचा पेरा वाढणार

By Admin | Updated: June 21, 2014 01:27 IST2014-06-21T01:13:44+5:302014-06-21T01:27:12+5:30

अकोला जिल्ह्यातील पेरणी रखडली : शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा

Pea and lentil soup will decrease; Cotton sowing will increase | मूग, उडिदाचा पेरा घटणार; कापसाचा पेरा वाढणार

मूग, उडिदाचा पेरा घटणार; कापसाचा पेरा वाढणार

अकोला : यंदा पावसाळा लांबल्यामुळे ज्वारी, मूग, उडिदाचा पेरा घटण्याची शक्यता आहे. यामुळे मूग, उडिदाच्या क्षेत्रावर कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.
या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने जिल्हय़ातील ४ लाख ८३ हजार हेक्टरकरिता विविध पिकांचे नियोजन केले आहे. कापसाचे क्षेत्र ४0 हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता असल्यामुळे बीटी व देश कापूस मिळून ५ लाख १३ हजार ७00 पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली. तसेच ज्वारी १,३९९ क्विंटल, संकरित बाजरी १२, मका २,३६७, मूग २,४६0, उडीद ५७७ क्विंटल बियाणे मागविले होते. गेल्या वर्षी अतवृष्टीमुळे मूग, उडीद, ज्वारीचे पीक वाया गेले होते. त्यामुळे यावर्षी या पिकावर शेतकर्‍यांची भिस्त होती. तथापि यावर्षी पावसाळा अद्याप सुरू झाला नसल्यामुळे या पिकांचा पेरा कमी होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी झालेल्या अतवृष्टीमुळे ज्वारी, मूग, उडीद या पिकासंह सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे.
अध्र्याच्यावर सोयाबीन काळे पडले, काही ठिकाणी सोयाबीन फुटले. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. बाजारातील प्रमाणित बियाण्यासंबंधी शेतकर्‍यांना खात्री नाही. यामुळे यावर्षी कापसाचा पेरा वाढणार आहे.

Web Title: Pea and lentil soup will decrease; Cotton sowing will increase