शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पांडे गुरुजी, माधुरी गावंडेंना शिवसेनेतून डच्चू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 02:09 IST

अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पांडे गुरुजी व माधुरी गावंडेनी केली होती बंडखोरी.

अकोला, दि १७ : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी गत जूनमध्ये झालेल्या निवडणुकीत बंडखोरी केल्याने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांना अखेर शिवसेनेतून डच्चू देण्यात आला आहे. दोघांनाही शिवसेनेतून काढून टाकण्यात आल्याचा आदेश शिवसेनेचे पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी दिला.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी गत ३0 जून निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी नितीन टाले देशमुख व उपाध्यक्ष पदासाठी ज्योत्स्ना बहाळे यांना शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी मतदान करण्याचा आदेश (व्हीप) जारी करण्यात आला होता. परंतु शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मतदान न करता तटस्थ राहिले होते. तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य सदस्य माधुरी गावंडे यांनी भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांना मतदान केले होते.पक्षादेशाचे पालन न करता मतदान केल्याने व पक्षादेशाचे उल्लंघन केल्याने, यासंदर्भात आपल्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा सादर करण्याची नोटीस शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी चंद्रशेखर पांडे गुरुजी व माधुरी गावंडे यांना त्याच दिवशी बजावली होती. तसेच चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदावरून काढून, त्यांच्या जागी नितीन देशमुख यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेशही शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी दिला होता. त्यानंतर गत १३ जुलै झालेल्या जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडणुकीत रोजी शिवसेनेच्या बंडखोर सदस्य माधुरी गावंडे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आणि खातेवाटपात त्यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद देण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांना शिवसेनेतून काढण्यात येत असल्याचा आदेश मुंबई येथील शिवसेना भवनातून, शिवसेनेचे सचिव तथा पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी दिला.