शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीला कृतीतून चालना!

By admin | Updated: July 14, 2014 01:24 IST

सेंद्रिय शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

अकोला : सेंद्रिय शेतीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत ६८ शेतकर्‍यांनी येथून सेंद्रिय शेती प्रशिक्षण प्रमाणपत्र (पदविका) ग्रहण केली असून, त्यांनी दज्रेदार सेंद्रिय पिके व पदार्थ निर्मितीला सुरुवात केली आहे.सर्वच पिकांमध्ये वाढलेला कीटकनाशक रसायनाचा वारेमाप वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी, रसायनाचा हा वापर कमी न होताच अधिक वाढला आहे. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकर्‍यांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहेत.सेंद्रिय शेती पदविका अभ्यासक्रमासह सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गावरदेखील भर देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व भारत सरकारच्या विभागीय सेंद्रिय शेती केंद्र नागपूरच्यावतीने विदर्भातील शेतकर्‍यांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण वर्गाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सेंद्रिय पदार्थांना उपलब्ध असलेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लक्षात घेता, भारतीय सेंद्रिय उत्पादने, पदार्थांना मोठा वाव आहे. राज्य सरकारने सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेद्वारे सेंद्रिय शेतीला पाठबळ दिले आहे. असे असले तरी या शेतीचा प्रसार अधिक गतीने होण्यासाठी शेतकर्‍यांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. यासाठीच नव्याने सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेणारी तिसरी तुकडी बाहेर पडली आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विदर्भात प्रशिक्षित शेतकरी निर्माण करण्याचे धोरण यशस्वी ठरत आहे. अकोला जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी या माध्यमातून स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत. यात तेल्हारा तालुक्यातील महिला शेतकर्‍यांचा समावेश आहे.