पिंजर महाजल योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश

By Admin | Updated: June 17, 2014 20:13 IST2014-06-17T19:49:42+5:302014-06-17T20:13:54+5:30

८ वर्षांपासून बंद पडलेल्या महाजल योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाकडून दिला आहे.

Order to complete the work of the Cigar Mahajal scheme immediately | पिंजर महाजल योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश

पिंजर महाजल योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश

पिंजर : बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर येथील ८ वर्षांपासून बंद पडलेल्या महाजल योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाकडून या योजनेचे अध्यक्ष आणि सचिवांना देण्यात आले असून, दिरंगाई केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही उपविभागीय अभियंत्यांनी त्यांना दिला आहे.
पिंजर येथील महाजल योजनेच्या कामाला तब्बल ८ वर्षांपूर्वी सुरु वात झाली; परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे काम सतत बंद पडत गेल्याने आजवरही या योजनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. शासनाने या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्चही केला; परंतु काम पूर्ण न झाल्यामुळे गावकर्‍यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. या योजनेसाठी ज्या उद्देशाने शासनाने निधी मंजूर केला तो अद्यापही पूर्ण होऊ शकला नाही. या संदर्भात जि.प. सदस्य अक्षय लहाने यांनी २१ मे रोजी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला होता. अखेर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी त्या प्रश्नाची दखल घेत पिंजर महाजल योजनेचे काम तातडीने पूर्ण क रण्याचे आदेश या योजनेचे अध्यक्ष आणि सचिवांना देण्यात आले असून, या योजनेच्या उपसमितीमध्ये सरपंचांचाही समावेश असल्यामुळे त्यांनाही हे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Order to complete the work of the Cigar Mahajal scheme immediately