शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
3
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
4
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
5
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
6
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
7
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
8
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
9
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
10
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
11
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
12
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
13
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
14
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
15
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
16
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
17
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
18
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
19
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
20
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा

विदर्भातील संत्रा फळ पीक धोक्यात; फळ गळती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 2:02 PM

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने विदर्भातील फळ पिकांना झळ पोहोचत असून, मृग बहारातील संत्रा फळ गळती सुरू झाली आहे, तसेच रोगराई वाढत असल्याने यावर्षीही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे.

अकोला : यावर्षी पाऊस कमी झाल्याने विदर्भातील फळ पिकांना झळ पोहोचत असून, मृग बहारातील संत्रा फळ गळती सुरू झाली आहे, तसेच रोगराई वाढत असल्याने यावर्षीही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५० हेक्टर संत्रा फळ पिकांचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु सतत बदलत असलेल्या हवामानाचा संत्रा फळ पिकांवर परिणाम होत आहे. मागील पंधरा ते सतरा वर्षांपासून विदर्भातील पावसाची अनिश्चितता जाणवत असून, एक, दोन वर्षे सोडले, तर यातील बहुतांश वेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. २००४-०५ मध्ये पाऊस खूपच कमी झाला होता. त्याचा परिणाम संत्रा फळे, झाडांवर झाला. शेतकºयांना संत्रा झाडे तोडावी लागली. जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील संत्र्यांची झाडे शेतकºयांनी तोडली होती. यावर्षी तेच चित्र असून, पाऊस नसल्याने आर्द्रता नाही, जमिनीतील पाण्याची पातळी घसरल्याने आवश्यक ओलावा नसल्याने आतापासूनच संत्र्याच्या आरोग्यावर कायिक परिणाम होत असल्याचे चित्र आहे. काही भागात मृग बहारातील संत्रा फळगळती सुरू झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.या सर्व प्रतिकूल वातावरणामुळे अगोदरच डिंक्या रोग येऊ नये म्हणून उपाययोजना करणाºया शेतकºयांकडे पाणीच नसल्याने मृग बहार हाती लागतो की नाही, हे संकट आहे. राज्यातील इतर फळ पिकांची अवस्था जवळपास अशीच आहे. रोजगार हमी योजना व नंतर राष्टÑीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्टÑ देशात प्रथम क्रमांकावर आहे. म्हणूनच या राज्यात संत्रा १ लाख ५० हजार हेक्टर तसेच इतर फळांचे क्षेत्र आहे; परंतु सतत या ना त्या रोगाचा सामना करणारा संत्रा उत्पादक शेतकºयाला यावर्षी अपुरा पाऊस झाल्याने पुन्हा संकटाचा सामना करावा लागत आहे.

विहिरी, कूपनलिकांची पातळी घसरली!शेतकºयांकडे विहिरी, कूपनलिकांची व्यवस्था आहे. पाऊस नसल्याने या सर्व स्रोतांची पातळी खालावली आहे. विदर्भातील बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातील स्थिती वाईट आहे.

सध्या मृग बहराचा संत्रा झाडावर आहे; पण पाणीच नसल्याने फळगळती सुरू झाली आहे. पाणी उपलब्ध असल्यास शेतकºयांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करू न फळे पिके जगविण्याची गरज आहे.डॉ. शरद निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भagricultureशेतीFarmerशेतकरी