शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

दिवसभरात एकाचा बळी; १३ नवे पॉझिटिव्ह, ३२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 7:23 PM

रविवारी दिवसभरात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६७९ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात सुरु असलेला कोरोनाचा हैदोस थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या विषाणूने गत चार महिन्यांपासून कहर केला आहे. रविवार, २ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ११० वर गेली आहे. तर रविवारी दिवसभरात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या २६७९ झाली आहे. दरम्यान, ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे २४५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३२ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सहा महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. सकाळी सिंधी कॅम्प-शास्त्री नगर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १२ जणांमध्ये खांबोरा येथील चार जण, कापसी येथील तीन जण, जीएमसी हॉस्टेल, सिंधी कॅम्प, बोंदरखेड, पीकेव्ही व जूना शहर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.८१ वर्षीय वृद्ध दगावलाकोरोनाच्या बळींची संख्या वाढतच असून, रविवारी जुने शहरातील बाळापूर रोड भागातील ८१ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीस २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.३२ जणांना डिस्चार्जरविारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १२, कोविड केअर सेंटर अकोला येथून १२, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, तर आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.४२३ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६७९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २१४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ११० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या