अकोला-मूर्तिजापूर मार्गावर तिहेरी अपघातात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:50 AM2020-12-04T04:50:42+5:302020-12-04T04:50:42+5:30

अकोल्याहून मूर्तिजापूरकडे जाणारा कंटेनर ट्रक क्रमांक जी.जे.१२ बी.एक्स. जात असताना वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकची ट्राली उलटली. दरम्यान, मूर्तिजापूरकडे ...

One injured in triple accident on Akola-Murtijapur road | अकोला-मूर्तिजापूर मार्गावर तिहेरी अपघातात एक जखमी

अकोला-मूर्तिजापूर मार्गावर तिहेरी अपघातात एक जखमी

googlenewsNext

अकोल्याहून मूर्तिजापूरकडे जाणारा कंटेनर ट्रक क्रमांक जी.जे.१२ बी.एक्स. जात असताना वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकची ट्राली उलटली. दरम्यान, मूर्तिजापूरकडे जाणारी कार क्रमांक एम.एच.३० ए झेड ३९४६ व मूर्तिजापूरहून अकोल्याला येत असलेल्या ट्रक क्रमांक एम.एच.३६ ए.ए.२२१६ या वाहनांची धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या तिहेरी अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र कारमधील एक जण गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील सोळंके यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. गत काही वर्षांपासून महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधित विभागाने दखल घेऊन चौपदरीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.(फोटो)

Web Title: One injured in triple accident on Akola-Murtijapur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.