विवाहितेची छेड काढणार्‍या जेठाविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: May 24, 2014 19:50 IST2014-05-23T22:45:06+5:302014-05-24T19:50:07+5:30

शौचास जाणार्‍या विवाहितेची छेड काढणार्‍या जेठाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल.

Offense against a married person | विवाहितेची छेड काढणार्‍या जेठाविरुद्ध गुन्हा

विवाहितेची छेड काढणार्‍या जेठाविरुद्ध गुन्हा

अकोला: शौचास जाणार्‍या विवाहितेची छेड काढणार्‍या जेठाविरुद्ध आकोट फैल पोलिसांनी शुक्रवारी दुपारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
शहरापासून काही अंतरावर असलेल्या घुसर येथे राहणार्‍या एका ३४ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २३ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शौचासाठी गेली असता, तिचा जेठ संजय किसनसिंह लहरिया याने आपली छेड काढली. जेठाचा विरोध केला असता, त्याने अश्लील शिवीगाळ केली. महिलेच्या तक्रारीनुसार आकोट फैल पोलिसांनी आरोपी संजय लहरिया याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Offense against a married person