टँकरची संख्या घटली

By Admin | Updated: May 7, 2014 21:32 IST2014-05-07T20:58:35+5:302014-05-07T21:32:53+5:30

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व जलाशयातील लोकसभागाद्वारे गाळ काढण्या मोहिम हाती घतली होती.

The number of tankers decreased | टँकरची संख्या घटली

टँकरची संख्या घटली

बुलडाणा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व जलाशयातील लोकसभागाद्वारे गाळ काढण्या मोहिम हाती घतली होती. या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जलाशये भरलेली असुन त्यामुळेच पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. यावर्षी केवळ तिन गांवामध्येच ६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई हा चिंतेचा विषय बनला होता. गेल्या पाच वर्षापासून उन्हाळा आला की, जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील २२० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण व्हायची. त्यामुळे या गावांना पाण्यासाठी केवळ टँकरचा आधार घ्यावा लागत असे. मात्र या पाणीटंचाईवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जलाशयातील ६ लाख घनमिटर गाळ काढण्याचे नियोजन आखण्यात आले होते. मार्च आणि एप्रिल २०१३ मध्ये ४ लाख ५४ हजार ९४ घनमिटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला. त्यामुळे २५ कोटी लिटर जलसाठवण क्षमता पुनर्स्थापित झालीे. मेहकर तालुक्यात १४ प्रकल्पाचा, देउळगांवराजा २३ प्रकल्प, बुलडाणामध्ये ४२ प्रकल्प आणि खामगांव ५८ प्रकल्पातून गाळ काढण्यात आला. लोकसहभागातून गेल्या वर्षी २३० जलाशयांमध्ये ३६ लाख ५८ हजार १८९ घनमीटर गाळ निघाला.

Web Title: The number of tankers decreased