नवीन शिक्षानीती बहुजन समाजासाठी धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:17 AM2021-01-18T04:17:07+5:302021-01-18T04:17:07+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेवराव भुईभार, तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, विजय कौसल, डॉ. उमर ...

New education policy is dangerous for the masses | नवीन शिक्षानीती बहुजन समाजासाठी धाेकादायक

नवीन शिक्षानीती बहुजन समाजासाठी धाेकादायक

Next

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेवराव भुईभार, तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, विजय कौसल, डॉ. उमर कहाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सूरज मेश्राम यांनी समितीची भूमिका मांडली; तर विजय कौसल यांनी सामान्य नागरिकांनी ह्या नवीन शिक्षा नीतीविरोधात ठाम भूमिका घेण्याची गरज स्पष्ट केली. राजेश भीमकर, गजानन देशमुख यांनी संचलन, तर संदीप बाजरे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आक्रमण युवक संघटना, सत्यशोधक समाज, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक महासंघ, बिल्डिंग पेन्टर बांधकाम व असंघटित मजूर संघ, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), जमाअत ए इस्लामी हिंद संघटना, प्रबोधन सभा, युवा मुक्ती आंदोलन, बु्द्धविहार समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, बहुजन माध्यमिक शिक्षक संघ, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ, सम्राट युवा संघटना, जनसत्याग्रह संघटन, इ. संघटनांनी परिश्रम घेतले.

Web Title: New education policy is dangerous for the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.