शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी आक्रमक; कॉँग्रेसचे ‘वेट अँण्ड वॉच’!

By admin | Updated: August 22, 2014 00:25 IST

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाबाबतची चर्चा सुरू असतानाच अकोला जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपाबाबतची चर्चा सुरू असतानाच अकोला जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीकडून पाचही मतदारसंघातील ४९ इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसने मात्र राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. जागा वाटपाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेत असताना काँग्रेसने ह्यवेट अँण्ड वॉचह्णची भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या घोषणेनंतर जागा वाटपाबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात. वाढीव जागांची मागणी करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रश्न ताणून धरल्यामुळे आतापर्यंतच्या चर्चा निष्पळ ठरल्यात. त्यामुळे २१ ऑगस्टची जागा वाटपच्या चर्चेसाठी बोलावलेली बैठक २४ पर्यंंत पुढे ढकलण्यात आली. राज्य पातळीवर चर्चेची गुर्‍हाळे सुरू असताना अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत पाचही मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले. पाचही मतदारसंघातून अर्ज स्वीकारण्यासाठीची मुदतसुद्धा त्यासाठी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली होती. २१ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. अर्जांंसह यादी प्रदेशाध्यक्षांकडे रवाना करण्यात आली आहे. एकीकडे काँग्रेसने जिल्ह्यातील मूर्तिजापूर वगळता त्यांच्या वाट्याला आलेल्या इतर चार मतदारसंघातील इच्छुकांच्याच मुलाखती १७ ऑगस्ट रोजी मुंबईत घेतल्यात. असे असतानाही राष्ट्रवादीने २७ ऑगस्ट रोजी होणार्‍या मुलाखतीसाठी पाचही मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज स्वीकारून काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.