शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरेकरांना अंध कासीम बेगच्या रामभजनांचा लळा

By admin | Updated: September 19, 2014 00:23 IST

दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेलेल्या अंध कासीम बेग हा डोळस धर्मांधांसमोर एक आदर्श आहे.

सुहास वाघमारे /नांदुरासमाजात समरसता वाढावी, जातीयता व धर्मभेद विसरून नागरिक एकोप्याने राहावेत याकरिता व्यापक जागृती केली जाते; मात्र काही कलाकार कलेच्या व संगीताच्या माध्यमातून धर्माच्या व जातीच्या भिंती तोडून एकात्मतेचा संदेश देतात, असाच अनुभव मागील चार दिवसांपासून शहरातील संत जंगली महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन सप्ताहात येत आहे. महिला कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर व भजन तथा भक्तिगीतांनी नांदुरेकरांचे लक्ष वेधणारा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लातूर जिल्हय़ातील कासीम बेग या स्मिताताईच्या मानसपुत्राने व त्यांनी जपलेल्या मानवतेच्या नात्याने त्यांनी एकात्मतेचा संदेश दिला आहे.नांदुरा शहरात महादेव गौरक्षण संस्थान येथे संत जंगली महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भागवत कथा व कीर्तनांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये १३ ते १६ दरम्यान दररोज महिला कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांच्या सोबत त्यांचा मानसपुत्र कासीम बेग हा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला गायक त्यांच्या रामभजन, भक्तिगीत, गजल व कव्वाली यांच्या गायनाने अनेकांचे लक्ष वेधले. लातूर जिल्हय़ातील उद्गीर तालुक्यातील वाढोणा बु. या गावातील रहिवासी असलेल्या कासीमचे आई व वडील दोन्ही शेतमजूर आहे. त्यांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण विद्या विकास विद्यालय व एकलव्य अंध निवासी विद्यालयात झाले असून, त्याने आतापर्यंत दहावी, बारावी व पदवीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करून शैक्षणिक यश मिळविले आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने उच्च शिक्षणासाठी त्याला कीर्तनकार स्मिताताई यांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा हा मानस पुत्र आता प्रत्येक कीर्तनात भजन व भक्तिगीताने त्यांची साथ देत आहे. दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेलेल्या अंध कासीम बेग हा डोळस धर्मांधांसमोर एक आदर्श आहे.