शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

छंद माझा वेगळा!

By admin | Updated: December 10, 2014 01:47 IST

जयश्री बंड यांनी साकारल्या खडूपासून विविध शिल्पाकृती.

अकोला : छंद आपले आयुष्य आनंदी आणि सुखकर करतात. म्हणून आयुष्यात प्रत्येकानं एक तरी छंद जोपासावा, असे म्हटले जाते. येथील राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात गृहविज्ञानासह संगीत आणि राज्यशास्त्र हे विषय शिकविणार्‍या प्राध्यापिका जयश्री प्रमोद बंड यांनी खडूपासून विविध शिल्पाकृती निर्माण करण्याचा छंद जोपासला आहे. उपजतच कलेची आणि संगीताची आवड असलेल्या जयश्रीने या कला जोपासण्याची प्रेरणा वडील महादेवराव भुईभार व मामा विठ्ठल वाघ यांच्यामुळे मिळाली. शालेय जीवनात गायनाचे धडे घेत असतानाच विविध पारंपरिक कलाकृती तयार करण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली होती. १९९२ मध्ये श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी स्वीकारल्यानंतरदेखील जयश्रीने आपली कला जिवंत ठेवली. लहानशा खडूवर अत्यंत बारीक कलाकुसर करीत त्यांनी विविध महापुरुष, देवी-देवता आणि इतर कलाकृती साकारल्या आहेत. आकाराने लहान असल्या तरी अत्यंत सुबक व व्यक्तिरेखा ठळकपणे व्यक्त होणार्‍या या कलाकृतींमध्ये महात्मा गांधी, भगतसिंग, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे, सावित्रीबाई फुले, पेशवेकालीन स्त्रीया, विविध आकार आणि प्रकारचे गणपती, साईबाबा, तुळशी वृंदावन, महादेवाची पिंड, विविध काटरून, प्राणी, विविध प्रकारचे मासे, एवढेच नव्हे तर विविध प्रकारचे चेहरे यांचा समावेश आहे. १९८५ मध्ये शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रमोद बंड यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर केवळ पतीचे नव्हे, तर सासू-सासरे वत्सला आणि माधवराव बंड यांचेदेखील प्रोत्साहन आपल्या छंदाला लाभल्याचे त्या सांगतात. महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा मोहोड यांचेदेखील मार्गदर्शन लाभते. जोपासलेल्या छंदाचे वटवृक्षात रूपांतर व्हावे, अशी जयश्री बंड यांची मनीषा आहे.