मूर्तिजापूरात बुधवारी १३५ लोकांनी घेतली प्रतिबंधक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:34 IST2021-03-04T04:34:32+5:302021-03-04T04:34:32+5:30

तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नागरिकांची नित्याने तपासणी करण्यात येत आहे त्याच बरोबर प्रतिबंधात्मक लसीकरण सुध्दा करण्यात येत ...

In Murtijapur, 135 people were vaccinated on Wednesday | मूर्तिजापूरात बुधवारी १३५ लोकांनी घेतली प्रतिबंधक लस

मूर्तिजापूरात बुधवारी १३५ लोकांनी घेतली प्रतिबंधक लस

तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नागरिकांची नित्याने तपासणी करण्यात येत आहे त्याच बरोबर प्रतिबंधात्मक लसीकरण सुध्दा करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी बुधवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. बुधवारी १३ वायल मधून १३५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले यात ४२ ते ६० वयोगटातील २७ ज्येष्ठ नागरिक, साठ वर्षे वयाच्या वरील ८० नागरिक व इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. लसीकरणासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास सोनोने, डॉ. राजेंद्र नेमाडे, डॉ. वाडेकर, डॉ. प्रधान, श्रीमती वरेकर, श्रीमती वॉर्ड व ईतर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.

फोटो :

Web Title: In Murtijapur, 135 people were vaccinated on Wednesday