शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोळा चौकातील इसमाची हत्या

By admin | Updated: December 10, 2014 01:46 IST

पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप.

अकोला - पोळा चौकातील एका ४५ वर्षीय इसमाची अज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली. लोणी रोडवर गंभीर जखमी अवस्थेत असताना रउफ खान सलीम खान यांना सवरेपचार रुग्णालयात दाखल केले; मात्र दुपारी १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. चौकातील देशी दारू दुकानातील कामगार व जुने शहर ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाची पत्नी व मुलाने केला. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा अज्ञात मारेकर्‍यांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.पोळा चौक येथील रहिवासी रउफ खान सलीम खान (४५) हे सोमवारी रात्री चौकातील एका देशी दारूच्या दुकानावर गेले होते. या ठिकाणी त्यांचा दुकानदार व कामगारांशी वाद झाला. त्यामूळे जुने शहर पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्‍यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी व दुकानातील कामगारांनी त्यांना मारहाण केली, असा आरोप रउफ खान सलीम खान यांचा मुलगा हजरत बिलाल रउफ खान व पत्नी शबानाबी रउफ खान यांनी केला आहे. या मारहाणीनंतर मंगळवारी सकाळी रउफ खान लोणी रोडवरील एका शेताच्या बाजूला गंभीर जखमी आणि विवस्त्र अवस्थेत आढळून आले. शिवसेना वसाहतीमधील काही नागरिकांनी त्यांना सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे दुपारी १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पोलीस व देशी दारू दुकानातील कामगारांनी मारहाण करून त्यांना लोणी रोडवर नेऊन टाकले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पत्नी व मुलाने केला आहे. या प्रकरणाची तक्रार पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा व सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे करण्यात आली असून, दोषी पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍यांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.