शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा ‘एसडीओ’ कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: August 23, 2014 02:18 IST

मूर्तिजापूर येथे आरक्षणाची मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

मूर्तिजापूर: इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी)चे आरक्षण मिळून त्यांना ह्यएसटीह्णचे जात प्रमाणपत्रही देण्यात यावे, या मागणीसाठी तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी जी.एस. निपाने यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज मोठय़ा प्रमाणात आहे. धनगर आणि धनगड हे दोन्ही समाज एकच असून, केवळ एका छोट्या त्रुटीमुळे हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. गत ६७ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. इतर राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्राद्वारे गठित चलीया समितीने वर्ष २00२ मध्ये धनगर व धनगड हे दोन्ही समाज एकच असल्याचा अभिप्राय दिला होता. हाच अभिप्राय अलाहबाद उच्च न्यायालयानेही दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रातही धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी तालुका धनगर समाजाच्यावतीने शुक्रवारी येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या मोर्चात धनगर समाजातील पुरुष, महिला आपल्या शेळय़ा-मेंढय़ा आदी जनावरांसह सहभागी झाले होते. या मोर्चाचा समारोप उपविभागीय कार्यालयात झाला. तेथे उपविभागीय अधिकारी निपाने यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माजी पं.स. सदस्य मोहन रोकडे, सुरेश जोगळे, महादेवराव तिरकर, विनोद नागे, सुनील सरोदे, अशोक तिरकर, सुधाकर गोंडसे, प्रा. एल. डी. सरोदे, रवी शितोळे यांच्यासह धनगर समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.