प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

By Admin | Updated: February 19, 2015 00:17 IST2015-02-19T00:17:59+5:302015-02-19T00:17:59+5:30

जळगाव जामोद येथील घटना; विद्यार्थिनीचा विष घेऊन जीवन संपविण्याचा प्रयत्न.

Molestation of student by professor | प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरुन जळगाव जा.पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव जामोद येथील शरद पवार कृषी विज्ञान केंद्रात प्राध्यापक असलेल्या गोविंद गोपाल गाडगे (वय ४0) रा. धानोरा या प्राध्यापकाने याच महाविद्यालयात शिकणार्‍या एका २0 वर्षीय विद्यार्थिनीला तू मला फार आवडतेस माझ्यासोबत एक दिवस चल असे म्हणून हातवारे करीत विनयभंग केला, अशा आशयाची फिर्याद विद्यार्थिनीने जळगाव जामोद पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी गोविंद गाडगे याच्याविरुध्द कलम ३५४ अ, ब नुसार गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. शिक्षकी पेशाला कलंकीत करणार्‍या या शिक्षकाविरुध्द जनमाणसात संताप व्यक्त होत आहे. तर या घटनेनंतर विमनस्क अवस्थेत या विद्यार्थीनीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला खामगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.

Web Title: Molestation of student by professor