शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भेसळ रोखण्यासाठी मोबाइल प्रयोगशाळा!

By admin | Updated: August 20, 2014 00:45 IST

अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय : सहा वर्षांत आढळले १४ हजार दूषित नमुने

बुलडाणा : अन्न पदार्थांसह दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ त्वरित ओळखण्यासाठी राज्यात लवकरच मोबाइल प्रयोगशाळा सुरू केली होणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला असून, या प्रयोगशाळेमुळे भेसळखोरांवर 'वॉच' ठेवणे शक्य होणार आहे. मुंबई, ठाण्यासाठी १, पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागासाठी २ आणि अमरावती, नागपूरसाठी १ अशा ४ मोबाइल व्हॅन उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्सवांच्या काळातच अन्नपदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ होत असल्याचे अनेक चाचण्यांमधून निष्पन्न झाले आहे. ही भेसळ रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध प्रयोगशाळांनी अन्नपदार्थांचे २ लाख ७४ हजार ६६२ नमुने गत सहा वर्षांमध्ये तपासले. त्यापैकी १४ हजार ६६१ नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली आहे. या वर्षी जुलैच्या अखेरीस १९ हजार ७२ अन्न नमुने तपासण्यात आले. यामध्ये १0३१पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीमध्ये दूध, मिठाई, गुटखा, धान्य, किराणा सामान, चायनिज फूड, साखर आणि फळांच्या नमुन्यांचा समावेश होता. अन्नपदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा, शासकीय संस्था तसेच सार्वजनिक आणि खासगी संस्थामार्फत संकलित करून राज्यातील १५ सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमधून यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अन्न पदार्थांमध्ये भेसळ झाल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.