शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ची लवकरच धडक !

By admin | Updated: August 20, 2014 00:22 IST

कॉँग्रेसला धोका : अल्पसंख्याक मतांच्या विभाजनाची शक्यता

अकोला: विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या मतांसाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरु असताना, आता हैद्राबाद येथील मजलिस-ए-एतिहाद अल मुसलिमिन अर्थात एमआयएम विदर्भात धडक देण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. बुलडाण्यापाठोपाठ आता अकोल्यातही या पक्षाची शाखा लवकरच स्थापन होणार आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करणार्‍या पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अल्पसंख्याक मतांचा निर्णायक गठ्ठा असलेल्या अकोल्यात एमआयएमची धडक ही काही पक्षांच्या मुळावर, तर काहींच्या पथ्यावर पडणार आहे. राज्यात अल्पसंख्याक समाजाची निर्णायक मते आहेत. त्यामुळेच राज्य शासनाने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला. अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्येही अल्पसंख्याक समाजाची मते कमी नाहीत. त्यामुळेच एमआयएमने यंदा महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ३५ ते ४0 टक्के मुस्लिम मतदार असलेल्या मतदारसंघांवर एमआयएम लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानुसार अकोल्यातील बाळापूर, आकोट आणि अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. त्यामुळे अकोल्यात शाखा स्थापन केल्यानंतर हा पक्ष निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे.