शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम बांधणार समविचारी पक्ष, नेत्यांची मोट

By admin | Updated: October 27, 2014 22:44 IST

पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती व अकोल्यात एमआयएमची शाखा.

अजय डांगे/ अकोला विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धडकलेला हैद्राबाद येथील एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-एतिहाद अल मुसलिमिन) हा पक्ष आता समविचारी पक्ष आणि नेत्यांची मोट बांधण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवैसी लवकरच विदर्भात येणार असून, ते नागपूर, अमरावती आणि अकोला येथे येथे बैठक घेणार असल्याचे समजते. अल्पसंख्याकांच्या मतांचे राजकारण करणार्‍या कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस यासारख्या पक्षांमध्ये त्यामुळे अस्वस्थता पसरली आहे. यापूर्वीच्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निकाली काढला होता. राज्यात अल्पसंख्याक समाजाची निर्णायक मतं असून, ती डोळय़ासमोर ठेऊनच आघाडी सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला होता; मात्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमने राज्यातील ३५ ते ४0 टक्के मुस्लिम मतदारांवरच लक्ष केंद्रित केले होते. आता निवडणूक आटोपल्यानंतर एमआयएम विदर्भाकडे आपला मोर्चा वळविणार असल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती व अकोल्यात एमआयएमची शाखा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयएम समविचारी पक्ष आणि नेत्यांची मोट बांधणार आहे. यासाठी एमआयएमच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (युडीएफ), मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी आणि भारिप-बमसंच्या काही आजी-माजी पदाधिकार्‍यांशी संपर्क साधल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवारांनी अल्पसंख्यांक समाजाची निर्णायक मतं खेचली. अशा उमेदवारांच्या संपर्कातही एमआयएमचे नेते आहेत. *एमआयएमचा प्रवास एमआयएमचे आमदार अकबरूद्दिन ओवैसी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे हा पक्ष चर्चेत आला. याप्रकरणी आमदार ओवैसींविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. हैद्राबाद महापालिकेत १५0 पैकी ४३ नगरसेवक एमआयएमचे आहेत. एमआयएमने महाराष्ट्रात पहिली धडक नांदेड येथे दिली. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमने ५ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एक उमेदवार विजयी झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमने 20 मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले असून, ८ उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. या निवडणुकीत एमआयएमच्या सर्व उमेदवारांना एकूण ४ लाख ८९ हजार ६१४ मतं मिळाली.