शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींची विकास कामे लांबणीवर !

By admin | Updated: January 5, 2017 02:34 IST

महापालिकेला आचारसंहितेचा फटका; दोन महिन्यांपर्यंंत कामे ठप्प.

अकोला, दि. ४- शहरात कोट्यवधींची विकास कामे सुरू होतील, अशी सर्वपक्षीय नगरसेवकांसह अकोलेकरांची अपेक्षा होती. विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाची बुधवारी सायंकाळी आचारसंहिता लागू होताच कोट्यवधींच्या विकास कामांवर पाणी फेरल्या गेले आहे. आता किमान दोन महिन्यांपर्यंंत ही सर्व कामे ठप्प पडणार आहेत.महापालिका प्रशासनाला सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना, दलितेतर योजना, तसेच विशेष रस्ते अनुदानापोटी सुमारे २२ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांनी विकास कामांच्या प्रस्तावांमध्ये वारंवार बदल करून प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई केल्याचे परिणाम आचारसंहितेच्या निमित्ताने समोर आले आहेत. मध्यंतरी या सर्व विकास कामांना प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले होते; परंतु दलितेतर वस्ती योजनेतून होणार्‍या कामांचा विकास आराखडा तयार नसल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव बाजूला सारले. शिवाय नगरोत्थान योजनेत मनपाचा ३0 टक्के हिस्सा जमा करण्यास दिरंगाई झाली. बुधवारी मनपामध्ये आयोजित सर्वसाधारण सभेत कोट्यवधींची विकास कामे मंजूर होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल,अशी अपेक्षा आचारसंहितेमुळे फोल ठरली. 'अमृत'योजना लांबणीवरमनपाला 'अमृत'योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात प्राप्त ११0 कोटींमधून मनपा प्रशासनाने ८७ कोटी ३५ लाखांची निविदा मंजूर केली. निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मुंबईत बुधवारी राज्य शासनाच्या तांत्रिक समितीसमोर निविदा ठेवली असता, समितीनेदेखील मंजुरी दिली; परंतु आचारसंहिता लागू झाल्याने पाणीपुरवठा वितरण प्रणालीची कामे लांबणीवर गेली आहेत.'एलईडी'आता मार्चनंतरशहरात प्रकाशमान पथदिवे लावण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांना शासनाने एलईडी दिव्यांसाठी १0 कोटींचा निधी मंजूर केला. मनपाने १४ व्या वित्त आयोगातून उर्वरित १0 कोटी जमा केले. प्रशासनाने २0 कोटींची निविदा मंजूर केल्यानंतर स्थायी समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. स्थायीने मंजुरी देण्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाल्यामुळे एलईडीचा लख्ख उजेड आता मार्चनंतरच पडणार, हे निश्‍चित झाले आहे.अन् उद्घाटन झालेच नाही!अकोलेकरांच्या सेवेत नवीन सीटी बस दाखल झाल्या. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सिटी बसचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्य़ासाठी भाजपासह शिवसेनेने जय्यत तयारी केली होती. शिवसेनेला डावलून उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यास संबंधित कंपनीला खबरदारीचा इशाराही देण्यात आला होता. आचारसंहितेमुळे बसचे उद्घाटन होणार नसल्याची माहिती आहे.