माजी पोलिस अधीक्षकांकडून सुनेचा विनयभंग

By Admin | Updated: July 12, 2014 01:56 IST2014-07-12T01:42:46+5:302014-07-12T01:56:03+5:30

तेल्हारा पोलिसात गुन्हा दाखल.

Mention of hearing by former Superintendent of Police | माजी पोलिस अधीक्षकांकडून सुनेचा विनयभंग

माजी पोलिस अधीक्षकांकडून सुनेचा विनयभंग

तेल्हारा : माजी जिल्हा पोलीस अधीक्षक पर्वतराव पोहरकर यांच्याविरू ध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस खात्यात प्रचंड खळबळ माजली आहे. पोहरकर यांच्या विरोधात त्यांच्या सुनेने तेल्हारा पोलीस ठाण्यात आज दि. ११ जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. पर्वतराव पोहरकर हे वाशिम येथून सेवानवृत्त झाले आहेत. त्यांनी याआधी अमरावती एसआरपी व राज्याच्या विविध शहरामध्ये काम केलेले आहे. सेवानवृत्तीनंतर ते अकोला जिल्ह्यतील तेल्हारा येथे स्थायिक झालेत. येथे ते कुटुंबासह राहतात. २0 फेब्रुवारी २0१४ रोजी २१ वर्षीय सुनेला एकटे पाहून वाईट इराद्याने तिचा विनयभंग केला असा आरोप आहे. सुनेने दिलेल्या तक्रारीवरून पर्वतराव पोहरकार यांच्याविरुद्ध कलम ३५४ (१) (ब) नुसार गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास ठाणेदार शे. अन्वर यांचे मार्गदर्शनात पीएसआय रामभाऊ भस्कर करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला पर्वतराव पोहरकर याना अटक करण्यात आली नव्हती.

Web Title: Mention of hearing by former Superintendent of Police