शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

८४ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या मुद्यावर आज बैठक

By admin | Updated: October 27, 2014 01:30 IST

पाणीपुरवठा बंद करण्याची ‘मजीप्रा’ची अकोला जिल्हा परिषदेला नोटीस.

अकोला: अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावी, किंवा देखभाल-दुरुस्तीचा खर्च द्यावा, अन्यथा १ नोव्हेंबरपासून योजनेचा पाणी पुरवठा बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून (मजीप्रा) जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला देण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर सोमवारी जिल्हा परिषदेत मजीप्रा आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे. खारपाणपट्टय़ातील आकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत चालविण्यात येत आहे. दरम्यान, गत २0 मे रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालकांची बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्यानुसार आकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावी किंवा देखभाल व दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी दरमहा जिल्हा परिषदेने १५ लाख २५ हजार रुपये मजीप्राला द्यावे, अन्यथा १ नोव्हेंबरपासून आकोट येथील ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे, अशी नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ येथील जलव्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिली आहे. त्यानुषंगाने आकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांनी सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मजीप्रा व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांसह जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीत ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेसंबंधी काय निर्णय घेतला जातो, याकडे आता लक्ष लागले आहे.