शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

इदगाह मैदानाच्या सुविधेसाठी मनपावर मूक मोर्चा

By admin | Updated: June 15, 2017 01:10 IST

मुस्लीम बांधवांनी दिले महापौर विजय अग्रवाल यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुस्लीम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान महिन्यात ईद साजरी केली जाईल. जुने शहरातील हरिहरपेठ भागात इदगाह मैदानावर कोणत्याही सोयी सुविधा नसून, याठिकाणी मद्यपी व जुगारींचे अड्डे निर्माण झाले आहेत. मनपा प्रशासनाने इदगाह मैदानावर तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करीत मनपा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांच्या नेतृत्वात असंख्य मुस्लीम बांधवांनी महापालिकेवर मूक मोर्चा काढून महापौर विजय अग्रवाल यांना निवेदन सादर केले. रमजान महिन्यात ईदच्या दिवशी नमाज पठण करण्यासाठी शहरातील मुस्लीम बांधव हरिहरपेठस्थित मोर्णा नदीच्या काठावरील इदगाह मैदानावर एकत्र येतात. जून महिन्याच्या अखेरीस सर्वत्र ईद साजरी केली जाईल. हरिहरपेठ भागातील पुरातन व प्राचीन असलेल्या इदगाह मैदानाच्या देखभाल दुरुस्तीकडे मनपा प्रशासनाचे दुुर्लक्ष होत आहे. मैदानाला आवारभिंत किंवा तारेचे कुंपण नसल्यामुळे परिसरात मद्यपी आणि जुगार खेळणाऱ्यांची गर्दी दिसून येते. तसेच मैदानावर मोकाट कुत्रे, डुकरांचा मुक्त संचार असून, सर्वत्र घाण पसरल्याचे चित्र आहे. इदगाहच्या जागेवर मुस्लीम बांधव नमाज पठण करीत असल्यामुळे याठिकाणी महापालिकेने तातडीने मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करीत मनपा विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांच्या नेतृत्वात असंख्य मुस्लीम बांधवांनी बुधवारी मनपावर धडक दिली. खुले नाट्यगृह ते महापालिका कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर विजय अग्रवाल यांना निवेदन सादर करण्यात आले. मूक मोर्चामध्ये मुफ्ती बरार हाजी अ.रशीद, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, माजी नगरसेवक नाजीमोद्दीन खतीब, नगरसेवक अ‍ॅड. इकबाल सिद्दीकी, फिरोज खान, मोहम्मद इरफान, अब्दुल रहिम पेंटर, नकीर खान, मुफ्ती गुफरान, मोईन खान, मौलाना गुलाम मुस्तफा, झोन सभापती मोहम्मद नौशाद, आरीफुर्रहेमान खान, खान सरदार खान, डॉ. उमर काळे, हमीद हुसेन, मौलाना हाफीज खलील, हाजी इब्राहिम टाटा, हाफीज अफरोज, रवी शिंदे, कपिल रावदेव, मो. इरफान कुरेशी नईम फराज, जावेद तेली, राजीक कुरेशी, शहजाद अन्वर, महेमूद उस्मान, जमील आझाद, याकुब पहेलवान, सय्यद शहजाद, मंजूर अहमद, शेख हारून, इमरान शहा, इमरान खान, महेमूद खान पठाण आदींसह असंख्य मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.