मुख्य सोहळ्य़ात सामील होतील अडीच हजार योगपटू

By Admin | Updated: June 20, 2015 02:35 IST2015-06-20T02:35:43+5:302015-06-20T02:35:43+5:30

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त; नियोजन समितीच्या बैठकीत वर्तविला अंदाज.

The main ceremony will be attended by 25 thousand yoga teachers | मुख्य सोहळ्य़ात सामील होतील अडीच हजार योगपटू

मुख्य सोहळ्य़ात सामील होतील अडीच हजार योगपटू

अकोला : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जिल्हा स्तरावरील मुख्य सोहळ्यात अंदाजे अडीच हजार योगपटू सामील होतील, असा अंदाज जिल्हा स्तर मुख्य कार्यक्रम नियोजन समितीच्या बैठकीत वर्तविण्यात आला. शुक्रवार, १९ जून रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे नियोजन समिती पदाधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीमध्ये प्रत्यक्ष मुख्य कार्यक्रमामध्ये अंदाजे २५00 अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, योग क्षेत्रातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या असून, यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक विभाग, नेहरू युवा केंद्र, पोलीस विभाग, महानगरपालिका, स्वामी रामकृष्ण आश्रम येथील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला. मुख्य सोहळा पूर्वी डीपीडीकेव्ही क्रीडा मैदानावर होणार होता. मात्र, पावसाचा अंदाज घेऊन कार्यक्रमाचे स्थळ बैठकीत बदलण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. आता मुख्य कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, पदवीप्रदान समारंभ सभागृह येथे होणार आहे. रविवार, २१ जून रोजी सकाळी ७ ते ७.३३ पर्यंंत योगासन व सूर्यनमस्कार काढण्यात येतील.

Web Title: The main ceremony will be attended by 25 thousand yoga teachers