शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : विकास पडला मागे; सोशल मीडियावर आता जात-पात-धर्माची भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 12:43 IST

विकासाच्या मुद्यावर होणारी चर्चा बाजूला सारल्या गेली असून, आता पुन्हा एकदा जात-पात धर्माच्या नावावर ‘टिवटिवाट’ सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

अकोला: मतदानाचा अवधी जसजसा जवळ येत आहे, तसा सोशल मीडियावर संदेशांचा अक्षरश: पूर आल्याचे चित्र आहे. सुरुवातीला विकासाच्या मुद्यावर होणारी चर्चा बाजूला सारल्या गेली असून, आता पुन्हा एकदा जात-पात धर्माच्या नावावर ‘टिवटिवाट’ सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. यामध्ये तरुणाईकडून रोखठोक व स्पष्ट शब्दात मते व्यक्त केली जात आहेत.अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षाचे सर्व उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रचाराचा रोख मागील काही दिवसांपासून बदलला असल्याचे चित्र समोर येत आहे. त्याची सर्वाधिक चर्चा सोशल मीडियातील विविध माध्यमांवर खरपूसपणे रंगत आहे. लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासोबतच देशाला मजबूत सरकार देण्याच्या उद्देशातून सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदारांना आवाहन करणे अपेक्षित असताना या ठिकाणी मतदारसंघाच्या विकासाच्या मॉडेलवर चर्चा न होता, ती आता भरकटल्याचे दिसून येत आहे. विकासाला बाजूला सारत पुन्हा एकदा जाती-पातीचे व धर्माचे परंपरागत हत्यार उपसल्या जात असून, त्यावर फेसबुक, टिष्ट्वटर तसेच व्हॉट्स अ‍ॅपवर खमंग चर्चेच्या फैरी झडत आहेत.आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी!सोशल मीडियावर एकमेकांची उणीदुणी काढून तसे संदेश पसरविणारी यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रि य असल्याचे दिसून येते. कोणी किती वर्षांत विकास केला, यासोबतच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाची जडणघडण कशी झाली, यावर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नेटिझन्स स्वत:ची मते अत्यंत रोखठोक व स्पष्ट शब्दात व्यक्त करीत आहेत. यामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडताना दिसून येत आहेत.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरPoliticsराजकारण