शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कार्यालयाला ठोकले कुलूप

By admin | Updated: December 10, 2014 01:28 IST

मूर्तिजापूरच्या राष्ट्रशक्ती हम संघटनेसह वीज ग्राहकांनी केले आंदोलन.

मूर्तिजापूर (अकोला) : वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीजजोडण्या देण्यास त्रास देत असल्यामुळे संतापलेले वीजग्राहक व शेतकर्‍यांसह राष्ट्रशक्ती हम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार, ९ डिसेंबर रोजी स्थानिक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र निषेध व्यक्त केला.वीज वितरण कंपनीचे मूर्तिजापूर येथील अधिकारी सामान्य नागरिकांना जोडण्या देण्याकरिता नाहक त्रास देतात, ही नित्याचीच बाब आहे. मंगळवार, ९ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजताच्या दरम्यान मूर्तिजापूर येथील कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. तेथे आपल्या खोळंबलेल्या कामासाठी आलेले शेतकरी आणि ग्राहक हे अधिकारी व कर्मचारी येण्याची वाट पाहत ताटकळत बसले होते. नेमके याच वेळी राष्ट्रशक्ती हम संघटनेचे पदाधिकारी तेथे पोहोचले. त्यांनी तेथील परिस्थिती व शेतकरी व ग्राहकांची होणारी गैरसोय पाहून गैरहजर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानीचा निषेध करीत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला ताला ठोको आंदोलन केले. त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकल्याची माहिती कंपनीच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर दुपारी ३ वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले. तथापि, संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने व उपस्थित शेतकर्‍यांनी केली. या आंदोलनाची माहिती नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधानसभेत उपस्थित आमदार हरीश पिंपळे यांना कळताच त्यांनी फोनवरून संबंधित अधिकार्‍याची चांगलीच कानउघाडणी केली.