शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाप्रमुख पदासाठी मुंबईत लॉबिंग

By admin | Updated: May 9, 2015 01:55 IST

शिवसेनेची अवस्था बिकट; सक्षम उमेदवारच सापडेना!

आशिष गावंडे/ अकोला: शिवसेनेची जिल्हा कार्यकारिणी बदलण्याचे फर्मान पक्षप्रमुखांनी सोडल्यानंतर जिल्हाप्रमुख पदासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू आहे. जिल्हाभरात भक्कम पाय रोऊन उभा असलेला शिवसेनेचा वटवृक्ष शहरी भागापुरता र्मयादित झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. भाजपसह इतर राजकीय पक्षांना कडवे आव्हान देऊ शकणार्‍या कार्यकर्त्याच्या गळ्य़ात जिल्हा प्रमुखपदाची माळ पडणार असली तरी सक्षम उमेदवाराचा शोध घेताना पक्षाची चांगलीच दमछाक होत आहे.शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या पश्‍चिम विदर्भात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सपाटून मार खावा लागला. सेनेच्या ताब्यातील बहुतांश जागा मोदी लाटेत भाजपने सर केल्या. भाजपने केलेली सरशी पश्‍चिम विदर्भाचे संपर्कप्रमुख राहिलेल्या दिवाकर रावते यांच्यासाठी मोठे आव्हान ठरले. शिवाय मागील दहा वर्षांत अंतर्गत कलहापायी शिवसेना मोडीत निघाली. ज्या नेते-कार्यकर्त्यांनी पश्‍चिम विदर्भात शिवसेनेचे रोपटे वाढवले, नेमके त्यांनाच प्रवाहाच्या बाहेर फेकण्यात आले. मुंबईत बसून पक्षाची सूत्रे हलविणार्‍या नेत्यांच्या नाहक हस् तक्षेपामुळे पक्षात नवीन नेतृत्वच उदयास आले नाही. मध्यंतरी पक्षप्रमुखांनी दिवाकर रावते यांच्याकडील पश्‍चिम विदर्भ संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी मुंबईतील मलबार हिलचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे सोपवली. खा.सावंत यांच्याकडून पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची अ पेक्षा आहे. पक्षप्रमुखांनी जिल्हाप्रमुख बदलाचे आदेश दिल्याने स्थानिक पदाधिकार्‍यांच्या मुंबई वार्‍या वाढल्या आहेत.