बिबट्याचा हल्ला; तीन बकऱ्या ठार

By Admin | Updated: June 14, 2017 00:17 IST2017-06-14T00:17:11+5:302017-06-14T00:17:11+5:30

कोठारी (अकोला) : पातूर तालुक्यातील कोठारी खुर्द या गावात १२ जूनच्या रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल््यात तीन बकऱ्या ठार झाल्या.

Leopard attack; Three goats killed | बिबट्याचा हल्ला; तीन बकऱ्या ठार

बिबट्याचा हल्ला; तीन बकऱ्या ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी (अकोला) : पातूर तालुक्यातील कोठारी खुर्द या गावात १२ जूनच्या रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल््यात तीन बकऱ्या ठार झाल्या. कोठारी येथील भीमराव चंद्रभान झ््याटे यांच्या मालकीच्या असलेल्या बकऱ्यांवर घराला लागून असलेल्या गोठ्यात जाऊन बिबट्याने हल्ला केला असल्यामुळे रात्री गावात फार मोठी धांदल उडाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची माहिती पातूर वन विभागाला दिली असता, वनपाल एस.यू. वाघ, वनरक्षक वाय.पी. सरकटे, वनमजूर खंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बकऱ्यांचा पंचनामा केला. या व्यतिरिक्त एक बकरी बेपत्ता असल्यामुळे ती बिबट्याने नेली असावी,असा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Leopard attack; Three goats killed