शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रींच्या लेकींची शौचालय बांधकामातही आघाडी

By admin | Updated: December 10, 2014 00:07 IST

१२१ महिलांनी बांधले शौचालय

संतोष वानखडे / वाशिम विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणार्‍या सावित्रीच्या लेकी, अर्थात महिला शौचालय बांधकामातही पुढेच असल्याचे चित्र दिसत आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या कालावधीत कुटुंबप्रमुख असलेल्या १२१ महिलांनी स्वत:च्या घरी शौचालय बांधून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेले निर्मल भारत अभियान वाशिम जिल्ह्यातही राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट आहे. गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्वच्छता अभियान कक्षाच्यावतीने घरोघरी शौचालय बांधकाम करण्याचा नारा दिला जात आहे. सर्वच घटकांकडून वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम होत असल्याने आपणच मागे का रहावे, या प्रश्नावर जिल्ह्यातील महिला कुटुंबप्रमुखांनी मंथन केले. त्या केवळ मंथन करूनच थांबल्या नाहीत; तर शौचालय बांधकाम प्रत्यक्षात पूर्ण केले. एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यात १२१ महिलांनी स्वत:च्या घरी वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण केले आहे. सर्वाधिक ३१ शौचालयांचे बांधकाम मानोरा तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल मंगरुळपीर तालुक्यात २९, कारंजा व रिसोड प्रत्येकी २५ तर वाशिम तालुक्यात ११ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात जवळपास १६0 महिला कुटुंबप्रमुखांनी आणखी शौचालय बांधकाम करण्याचा संकल्प सोडला आहे. हगणदरीमुक्ती आणि शौचालय बांधकामाबाबत जिल्हा परिषद प्रशासन व स्वच्छता अभियानाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. घरी शौचालय नसल्याची गैरसोय महिलावर्गाला सर्वाधिक सहन करावी लागते. शौचालय बांधकामासाठी महिलांमध्ये जनजागृती केली जात आहे. याचाच परिणाम म्हणजे आठ महिन्यात १२१ महिलांनी घरी शौचालय बांधकाम केले असल्याचे वाशिम जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगीतले. *मालेगाव तालुका निरंकमालेगाव तालुक्यात चालू वर्षाच्या आठ महिन्यात एकाही महिला कुटुंबप्रमुखाने वैयक्तिक शौचालय बांधकामाचा श्रीगणेशा केला नाही. जनजागृती मोहिमेला मालेगाव तालुक्याकडे आता विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.