शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

निंब बीज व सीड बॉल रोपण अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 10:52 IST

निंब वृक्ष लागवड व सीड बॉल रोपण अभियानाचा शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नायगाव येथे प्रारंभ करण्यात आला.

अकोला : भारत वृक्ष क्रांती मिशन या संस्थेमार्फत जिल्ह्यात निंब वृक्ष लागवड व सीड बॉल रोपण अभियानाचा शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते नायगाव येथे प्रारंभ करण्यात आला. अकोला जिल्हा व शहराला पर्यावरणदृष्ट्या अत्यंत लाभदायक असलेल्या या अभियानात प्रत्येक अकोलेकरांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसीलदार विजय लोखंडे तसेच भारत वृक्ष क्रांती मिशनचे ए. एस. नाथन यांची उपस्थिती होती. यावेळी अकोला ते अकोट या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा हे बीजारोपण करण्यात येणार असून, वटवृक्षाच्या बियांचे सीड बॉलही दुतर्फा टाकून त्यांचे रोपण करण्यात येणार आहे. ए.एस. नाथन यांनी अकोला येथून अकोटकडे हे बीजारोपण करीत व सीड बॉल टाकत पदयात्रा सुरू केली. भारत वृक्ष क्रांती मिशन अंतर्गत सन २०१५ पासून अकोला जिल्ह्यात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’, ‘एक जन्म, एक वृक्ष’ ही वृक्षारोपणाची मोहीम राबविली. या मोहिमेला ‘अकोला पॅटर्न’ म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. आता वृक्ष रोपणाचा एक भाग म्हणून संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात निंबाच्या झाडाच्या बीजांचे रोपण करण्याचा मिशनचा प्रयत्न आहे. निंबाच्या झाडाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे या लागवड अभियानाचा साऱ्यांना फायदाच होईल, असे ए.एस. नाथन यांनी सांगितले.

असे राबविण्यात येणार अभियानया उपक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी निंबाच्या झाडाच्या बिया गोळा करून आपआपल्या शेताच्या बांधावर ७ ते १० फूट अंतरावर दोन इंचाचे खड्डे करून त्यात दोन बिया रोपण कराव्यात. तसेच आपआपल्या घराजवळील परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानाच्या आजूबाजूला, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी व इतर ठिकाणी दोन इंचाचे खड्डे करून त्यात दोन बिया रोपण कराव्यात. गावातील नागरिक, विद्यार्थी, युवा संघटना व सामाजिक संघटना यांनी ई-क्लास जमीन, खुली जमीन, वनजमीन, डोंगराळ जमीन, रस्त्याचे आजूबाजूला व इतर पडीक जमिनीमध्ये दोन इंचाचे खड्डे करून त्यात दोन बिया रोपण कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच शहरातील नगरपालिका यांच्यामार्फत बियांचे रोपण करण्यात येईल.

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण