राष्ट्रीय शाळेत बालसंस्कार शिबिराला आरंभ

By Admin | Updated: May 6, 2014 17:56 IST2014-05-06T17:32:58+5:302014-05-06T17:56:53+5:30

अकोला : टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर, मोठी उमरी येथे बालसंस्कार शिबिराला नुकतीच सुरुवात झाली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले हे शिबिर यंदादेखील आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात बालकांना संस्काराचे धडे दिल्या जात आहेत.

Launch of Child Sanskar Camp in National School | राष्ट्रीय शाळेत बालसंस्कार शिबिराला आरंभ

राष्ट्रीय शाळेत बालसंस्कार शिबिराला आरंभ

अकोला : टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर, मोठी उमरी येथे बालसंस्कार शिबिराला नुकतीच सुरुवात झाली. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले हे शिबिर यंदादेखील आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात बालकांना संस्काराचे धडे दिल्या जात आहेत.
शिबिराचे उद्घाटन मुंबई येथील भागवताचार्य जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आदर्श गोसेवा प्रकल्पाचे रतनलाल खंडेलवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विवेक बिडवई, माणिकराव नालट, पांडुरंग तळोकार, सुभाष वाकोडे आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी कृष्णा महाराज घोडके, शरद जाधव, आकाश तिखिले, विनायक साठे, दिलीप रोकडे, रवी आखरे, मोहन ताथोड, श्रीकांत दिवनाले, शुभम ताथोड, सचित भटकर, राम पाटील मानकर आदी परिश्रम घेत आहेत. शिबिरात बालक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
फोटो : ०७ सीटीसीएल ०५ व ०६

Web Title: Launch of Child Sanskar Camp in National School