शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांवर किडींचे आक्रमण!

By admin | Updated: August 31, 2015 01:30 IST

पश्‍चिम विदर्भात शेतक-यांवर संकट, पन्नास टक्के अनुदान अद्याप आलेच नाही !

अकोला : खरीप पिकांवर विविध किडींनी आक्रमण केले असून, भुरके सोंडे यांचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून आला आहे. यातील काही किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाने ५0 टक्के अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध केली आहेत; परंतु शेतकर्‍यांना कीटकनाशक मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पावसाअभावी मेटाकुटीस आलेल्या पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांवर आता हे नवीन संकट कोसळले आहे.पावसाअभावी पिकांवर किडीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पश्‍चिम विदर्भात ३१ लाख २३२ हेक्टर क्षेत्रावर यावर्षी शेतकर्‍यांनी विविध पिकांची पेरणी केली. यात कापूस व सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे किडींनी कापूस, सोयाबीन व इतर पिकांवर आक्रमण केले आहे. सद्यस्थितीत खरीप पिकावर भुरक्या सोंड्याचा (मायलोसेरस सोंडे, मॅकुलॅसस डेसबर) प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही कीड बहुभक्षी असून, पीक फुलावर येईपर्यंंत ती असते. सध्या या सोंड्याचा मुक्काम कापूस, सोयाबीन, भेंडी, अंबाडी, मका, ऊस, तूर, रांगी, बाजरी, आंबा, बोर, स्ट्रॉबेरी, डाळिंब, सफरचंद, पीयर, पीच सिसम या पिकांवर आहे. ही कीड पिकांचे पाने कडेने कुरतुडून खातात, त्यामुळे पानाला नागमोडी आकार येऊन पाने कंगोर्‍यासारखे नक्षीदार दिसतात. हे सोंडे वाढलेल्या कपाशीच्या पात्या, फुले व कोवळ्य़ा बोंड्यांना नुकसान करतातच शिवाय खाद्य वनस्पतीच्या मुळावर हल्ला करू न मुळ्य़ा खातात. कपाशीमध्ये अळ्य़ांचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडे वाळतात. या किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकर्‍यांचा खर्च वाढत आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना ५0 टक्के अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करू न देण्यासाठीची घोषणा केली आहे. परंतु शेतकर्‍यांना अनुदानावर कीटकनाशके मिळत नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.