चिमुकल्याचे अपहरण

By Admin | Updated: February 26, 2015 01:29 IST2015-02-26T01:29:33+5:302015-02-26T01:29:33+5:30

आकोट तालुक्यातील घटना.

Kidnapping of pinch | चिमुकल्याचे अपहरण

चिमुकल्याचे अपहरण

आकोट: तालुक्यातील आंबोडा येथील ८ वर्षीय मुलाचे अज्ञात आरोपीने अपहरण केल्याप्रकरणी बुधवारी दुपारी आकोट ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आंबोडा येथील पोलीस पाटील महेश जानराव शिवरकार (४0) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा शुभम शिवरकार (८) हा घराबाहेर खेळत होता. दरम्यान, अज्ञात आरोपीने त्याचे घरासमोरून अपहरण केले. शुभम अचानक गायब झाल्याने त्याच्या आई-वडिलांनी गावामध्ये त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु शुभम मिळून आला नाही. अखेर महेश शिवरकार यांनी आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेची दखल घेऊन सर्वत्र नाकाबंदी केली आणि शुभमच्या शोधार्थ ठिकठिकाणी पोलीस पथके रवाना केली.

Web Title: Kidnapping of pinch