शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वनशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नोकरीपासून वंचित!

By admin | Updated: July 14, 2014 01:23 IST

केंद्र शासन व राष्ट्रीय वन आयोगाने वनविभागातील नोकरीत आरक्षण देण्याची शिफारस केली आहे

अकोला : राज्यातील वनशास्त्र पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना केंद्र शासन व राष्ट्रीय वन आयोगाने वनविभागातील नोकरीत आरक्षण देण्याची शिफारस केली आहे; परंतु राज्य शासन नोकरी देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठामध्ये वनशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. राज्यातील डॉ. पंजाबराव देशमुख अकोला व डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली या दोन ठिकाणी सन १९८५-८६ पासून वनशास्त्र पदवी अभ्यासक्रम शिकविला जात आहे. आतापर्यत शेकडो विद्यार्थ्यांनी वनशास्त्र अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केली आहे. या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना राज्य सरकारांनी वन विभागाच्या नोकरीत सामावून घ्यावे, अशा सुचना सन १९८८ च्या वननीतीनुसार केंद्र शासनाने राज्यांना केलेल्या आहेत. २00६ साली राष्ट्रीय वन आयोगानेही या पद्धतीची शिफारस केलेली असून, वनक्षेत्रपाल व सहाय्यक वनसंरक्षक नोकर भरती करताना वनशास्त्र पदवीधारकामधूनच करावी, असे स्पष्टपणे या आयोगाने निर्देश दिलेले आहेत. तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर, कर्नाटक, ओडिशा या राज्यांनी या विद्यार्थ्यांंना वनसेवेत आरक्षण दिलेले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना वन महाविद्यालयात पर्यावरण, वन्य जीव, वनसंवर्धन शास्त्र, वनव्यवस्थापन, वनआराखडा पद्धती, वनव्यवस्थापन अर्थशास्त्र, वनसंरक्षण व कायदे शिकविले जातात. एकूण ४९ वनासंबंधी विषयाचा अभ्यास या चार वर्षाच्या पदवी कालावधीत शिकवला जातो. तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहा महिने वन कार्यानुभव, व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. असे असताना पदवीची पायमल्ली होत असल्यांची भावना या विद्यार्थ्यांंची झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांंना बँकिंग, अग्रोबेस्ड इंडस्ट्रिज इत्यादी क्षेत्रात रोजगाराची संधी नाकारली जात आहे. दुसरीकडे वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या मोजक्या जागा आहेत. या स्पर्धेला तोड देऊन प्रवेश मिळवायचा दुसरीकडे नोकरीसाठी संघर्ष, यातच हे विद्यार्थी गार झाले आहेत.