शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन’ उमेदवारी अर्ज भरण्यात ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’चा खोडा

By admin | Updated: July 14, 2015 02:25 IST

ग्रामपंचायतींची निवडणूक; पहिला दिवस कोरा.

अकोला: जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सोमवार, १३ जुलैपासून सुरू झाली; मात्र शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात खोडा निर्माण होत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस जिल्ह्यात कोरा ठरला आहे. जिल्हय़ातील ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करणे व स्वीकारण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू झाली आहे. १८ व १९ जुलै हे सुटीचे दोन दिवस वगळता २0 जुलैपर्यंंत दररोज सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. सेतू सुविधा केंद्र, ई-महासेवा केंद्र, ग्रामपंचायतींमधील संग्राम कक्ष किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असलेल्या कोणत्याही ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत.ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करावयाची आहे. परंतु शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश सेतू सुविधा केंद्र, ई-महासेवा केंद्र, ग्रामपंचायतींच्या संग्राम कक्षातील इंटरनेट सुविधेत कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसून, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस कोरा ठरला.