एसटी कर्मचा-यांना मिळणार थकीत वाढीव महागाई भत्ता

By Admin | Updated: June 20, 2015 02:33 IST2015-06-20T02:33:33+5:302015-06-20T02:33:33+5:30

अकोला विभागात आनंदाची लहर.

Increase in Dearness Allowance for ST employees | एसटी कर्मचा-यांना मिळणार थकीत वाढीव महागाई भत्ता

एसटी कर्मचा-यांना मिळणार थकीत वाढीव महागाई भत्ता

अकोला : रापमच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवार, १९ जून रोजी झालेल्या विशेष बैठकीत जुलै १४ पासून थकीत असलेला ७ टक्के महागाई भत्ताचे जून आणि जुलैच्या पगारात वाटप करणार असल्याची घोषणा करण्यात आली. बैठकीला एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे, वित्तीय सल्लागार एकनाथराव मोरे, तसेच एसटी कामागार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, सरचिटणीस हनुमंतराव ताटे हे उपस्थित होते. जून महिन्याच्या पगारात ३५ कोटी, तर जुलै महिन्याच्या पगारात १४ कोटी रुपये, असे ४९ कोटी रुपये थकीत महागाई भत्त्यापोटी वितरित होणार असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अविनाश जहागीरदार यांनी लोकमतला दिली.

Web Title: Increase in Dearness Allowance for ST employees