अकोला ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन

By Admin | Updated: June 26, 2014 02:07 IST2014-06-25T21:19:36+5:302014-06-26T02:07:29+5:30

अकोला जिल्हा ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन; स्पर्धेत १२० बॉक्सर सहभागी

Inauguration of Akola Dual Boxing Championship | अकोला ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन

अकोला ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन

अकोला : वसंत देसाई क्रीडांगण येथे बुधवार, २५ जून रोजी अकोला जिल्हा ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत १२० बॉक्सर सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वाशिम जिल्हा शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे, प्रा. जमील अहमद, संजय पटेकर उपस्थित होते. स्पर्धा सिनिअर, युथ, ज्युनिअर, सब-ज्युनिअर, कब-क्लास गटात घेण्यात येत आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेच स्पर्धेतील लढतींना प्रारंभ करण्यात आला. प्राथमिक फेरीतल्या सायंकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या लढतींमध्ये शिवाजी मोरे, पूजा रहाटे, निखिल वगार, रोहण पटेकर यांनी विजय मिळविला. स्पर्धेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बॉक्सरांचा समावेश आहे. पंच म्हणून नीळकंठ देशमुख, प्रवीण अग्रवाल, राहुल धूत, अजय जारवाल, पुरुषोत्तम बावणे, राहुल वानखडे काम पाहत आहेत. राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ˜ट यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा घेण्यात येत आहे.

Web Title: Inauguration of Akola Dual Boxing Championship