शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आयजींनी केली गणेश मिरवणूक मार्गाची पाहणी

By admin | Updated: September 4, 2014 01:32 IST

अतिसंवेदनशिल अकोल्यात विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी मिरवणूक मार्गाची पहाणी केली.

अकोला : गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी यवतमाळ जिल्हय़ातील उमरखेड येथे किरकोळ कारणावरून दंगल उसळून उत्सवाला गालबोट लागले. अकोला शहर हे अतिसंवेदनशील असल्याने अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती या ठिकाणी व्हायला नको. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करून खबरदारी घेण्याच्या सूचना बुधवारी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी येथे केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी दुपारी ४ वाजता त्यांनी अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या उपस्थितीत गणेश मिरवणुकीसंदर्भात बैठक घेतली. बैठकीला पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा, मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आदींची बैठकीला उपस्थित होती. यावेळी जिल्हाधिकारी अरुण शिंदे व विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी ८ सप्टेंबर रोजी शहरातून निघणार्‍या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकसंदर्भात आढावा घेतला आणि शहर अतिसंवेदनशील असल्याने उत्सवाला गालबोट लागू नये. यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करून, अ ितसंवेदनशील भागांमध्ये सुरक्षा कठडे व बॅरिकेट्स लावण्यात यावे आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही केल्या. आयजींनी शहरातील सातही ठाणेदारांचीही बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. विभागीय आयुक्तांनी केली पाहणीविभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, आयजी बिपीन बिहारी, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी बुधवारी ४.३0 वाजताच्या सुमारास जय हिंद चौक, दगडीपूल, सुभाष चौक, ताजनापेठ पोलिस चौकी, गांधी चौक परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी केली. त्यांच्यासोबत मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर आदी होते. *शांतता समितीची बैठक शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत चर्चा करण्यासाठी सा तही पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या शांतता समिती सदस्यांची ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. असे पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी एपीआय भाऊराव घुगे यांनी कळविले आहे. *आकोटला ९ तर पातूरला ८ सप्टेंबरला विसर्जनबैठकीमध्ये अतिसंवेदनशील असलेल्या आकोट व पातूर तालुक्यातील गणेश विसर्जनासंदर्भातसुद्धा चर्चा झाली. यामध्ये आकोट येथे ९ सप्टेंबरला, पातूर येथे ८ स प्टेंबरला तर जिल्हय़ातील हिवरखेड येथे ९ व १0 स प्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार असल्याचे निश्‍चित करण्यात आले. इतर ठिकाणी ८ सप्टेंबर रोजी मिरवणूक निघेल.