स्वच्छता मोहिमेदरम्यानची हयगय भोवणार!

By Admin | Updated: June 22, 2015 02:41 IST2015-06-20T02:46:08+5:302015-06-22T02:41:20+5:30

'त्या' जि.प. कर्मचा-यावर निलंबनाची होणार कारवाई.

Hygiene during the cleanliness campaign! | स्वच्छता मोहिमेदरम्यानची हयगय भोवणार!

स्वच्छता मोहिमेदरम्यानची हयगय भोवणार!

अकोला: जिल्हा परिषदेत शुक्रवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्रत्येक विभागात पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांना बांधकाम विभागातील कर्मचारी साफसफाई न करता टेबलवर बसला असल्याचे निदर्शनास पडले. त्यामुळे त्यांनी सदर कर्मचार्‍याच्या निलंबनाची फाईल संबंधित अधिकार्‍यांकडून मागविली आहे. जिल्हा परिषदेत १९ जून रोजी साफसफाई मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनीही साफसफाई करीत प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. विविध विभागात मुख्य कार्यकारी अधिकारी पाहणी करीत असतानाच त्यांना बांधकाम विभागातील कनिष्ठ साहाय्यक नीलेश पिंपरकर टेबलवर बसलेले निदर्शनास पडले. अन्य कर्मचारी साफसफाई करीत असतानाच पिंपरकर बसलेले दिसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पिंपरकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास संपूर्ण जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

Web Title: Hygiene during the cleanliness campaign!