शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकिरणे वेधणारे हेमाडपंथी शिवालय

By admin | Updated: August 31, 2015 01:21 IST

श्रावण महिन्यात मोताळा तालुक्यातील कोथळी येथील प्राचीन चिंतामणी मंदीर आकर्षनाचे केंद्र ठरत आहे.

कोथळी (जि. बुलडाणा): मोताळा तालुक्यातील कोथळी येथे मनाला आकर्षित करणारे हेमाडपंथी शिवालय (चिंतामणी मंदिर) या नावाने ओळखण्यात येते. या मंदिराचे बांधकाम पुरातन कोरीव पद्धतीचे असून, एकरूपता जाणवते. प्रवेशद्वारासमोर शंकराचे वाहन असलेले नंदी विराजमान आहे. या नंदीच्या अंगावर विशिष्ट कलाकुशलतेने कोरलेली अखंड साखळी घंटा आहे. मंदिराचे खांब दगडी आहे. या मंदिराचे बांधकाम १३ व्या शतकातील असावे, असा जाणकाराचा अंदाज आहे. कोथळी गावाची अस्मिता जपणारे हे एक प्राचीन शिवालय आहे. मंदिराच्या गाभार्‍यात महादेवाची तेजस्वी शिवलिंगाची स्थापना आहे. या पिंडीचा गुळगुळीतपणा मनाला प्रफुल्लित करणारा असून, समोर सभामंडप असून, अखंड दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आहे. यावरून हे लक्षात येते की त्यावेळेस शिल्पकला अवगत होती. मंदिराच्या मागून वाहणारी विश्‍वगंगा नदी सौंदर्यात आणखी भर घालते. संध्याकाळी लालबुंद झालेला सूर्य मावळतीला असताना आपले प्रकाशकिरण पिंडीवर पडतो. तर सकाळी उगवताना गावातील पिंडीवर पाडतो. सूर्यकिरणे वेधून घेणारी हे शिवलिंग आहे गावातील व गावाबाहेरील मंदिराची कलाकृती प्रत्यक्ष पाहिली असता त्यातील कलाकुसर करणार्‍याचे परिङ्म्रम व सार्मथ्य व धनसंपत्ती यांची कल्पना येते ही कलाकृती आता काळाच्या ओघात जीर्ण होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या काळातील जीवनशैली कशी असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.