शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
4
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
5
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
6
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
7
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
8
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
9
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
10
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
11
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
12
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
13
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
14
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
15
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
16
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
17
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
18
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
20
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करा!

By admin | Updated: January 8, 2015 00:37 IST

लोकमतच्या परिचर्चेत शेतीच्या अभ्यासकांनी मांडल्या शेतकर्‍यांच्या व्यथा

अकोला : यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेजह्ण महिनाभरापूर्वी जाहीर करण्यात आले; मात्र शेतकर्‍यांना प्रत्यक्ष मदत किती मिळणार आणि मदतीचे स्वरूप कसे राहील, याबाबतचा निर्णय अद्यापही सरकारकडून काढण्यात आला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, असा सूर बुधवारी ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला.ह्यलोकमतह्ण कार्यालयात पार पडलेल्या या परिचर्चा कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामदास मालवे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, अकोला कृषी ग्राहक संघाचे अध्यक्ष हरिदास जायले पाटील उपस्थित होते. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे खरीप हंगामात जिल्ह्यात मूग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके हातून गेली. तसेच सोयाबीन पिकाचे उत्पादन एकरी ५0 किलो ते एक क्विंटलच्यावर झाले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५0 पैशाच्या आत आहे. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पृष्ठभूमीवर राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारमार्फत नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, गत ११ डिसेंबरला सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्धारही सरकारकडून जाहीर करण्यात आला. मदतीचे पॅकेज जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून जात आहे; मात्र दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना पीकनिहाय हेक्टरी किती मदत दिली जाणार, याबाबतचा निर्णय अद्यापही सरकारकडून काढण्यात आला नाही. मदतीचा निर्णय काढण्यात आला नसल्याने, मदत किती आणि केव्हा मिळणार, याबाबत दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने नापिकीमुळे दुष्काळाच्या झळा सहन करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, त्यासंबंधी निर्णय काढून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप सुरू करण्यात यावे, असा सूर या परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी मांडलेल्या विचारातून उमटला. दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचा विचारही यावेळी उपस्थित वकत्यांनी परिचर्चेत विशद करण्यात आला.