शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आलिमचंदानींच्या विरोधातील याचिकेवर २७ मार्चला सुनावणी

By admin | Updated: March 19, 2017 02:59 IST

‘टीसी’मध्ये घोळ, नगरसेवक पदावर टांगती तलवार

अकोला, दि. १८- महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून विजयी झालेले भाजपचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी यांच्या निवडीस न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, या आव्हान याचिकेवर २७ मार्च रोजी न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. हरीश आलिमचंदानी यांनी अर्ज सादर करताना दाखल केलेले जातवैधता प्रमाणपत्र संशयास्पद असून, त्यांची टीसीही प्रचंड घोळाची असल्याचे न्यायालयात सादर करण्यात आल्याने त्यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार आहे.प्रभाग क्रमांक १२ ब हा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. या प्रभाग क्रमांक १२ मधून हरीश आलिमचंदानी यांनी निवडणूक लढली. आलिमचंदानी यांच्यासह सहा उमेदवार १२ ब मधून रिंगणात होते. यामधील भाजपचे उमेदवार हरीश आलिमचंदानी विजयी झाले, तर अन्य पाच उमेदवारांचा पराभव झाला. यामधील मनोज साहू यांनी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. डी. मिश्रा यांच्या न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून हरीश आलिमचंदानी यांचे जातवैधता प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. यावरून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. डी. मिश्रा यांच्या न्यायालयाने हरीश आलिमचंदानी यांना १७ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता हरीश आलिमचंदानी यांच्या निवडी विरोधातील याचिकेवर २७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने आलिमचंदानी यांना कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे. त्यामुळे सदर प्रकरण हरीश आलिमचंदानी यांच्या चांगलेच अंगलट येत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मनोज साहू यांच्या वतीने अँड. चंद्रकांत वानखडे कामकाज पाहत आहेत.