शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मंत्रालय दूर करणार ‘दर्द का रिश्ता’!

By admin | Updated: January 3, 2015 00:42 IST

उपचार खर्च कमी करण्याचे आरोग्य मंत्रालयाच्या विचाराधीन.

अकोला : कर्करोगांवरील उपचारासाठी मानवी शरीरातील 'स्टेम सेल्स' अर्थात मूळ पेशी या अत्यंत प्रभावी ठरतात. या पेशी कुटुंबातील सदस्यांमध्ये आढळण्याचे प्रमाण केवळ २५ टक्के असल्याने, रुग्णाच्या कुटुंबीयांना ऐच्छिक दात्यांचा शोध घ्यावा लागतो. अशावेळी त्यांच्यासमोर उभा राहणारा खर्चाचा डोंगर कमी करण्याच्या उद्देशातून रुग्ण आणि स्टेम सेल्स दात्यांची अधिकृत माहिती एकत्रित करण्याच्या प्रस्तावावर आरोग्य मंत्रालय विचाराधीन आहे.कर्करोग म्हटला की, डोळय़समोर 'दर्द का रिश्ता' या हिंदी चित्रपटातील लाडक्या लेकीचा जीव वाचविण्यासाठी जीवाचं रान करणारा तिचा पिता सुनील दत्त उभा राहतो. ब्लड कँसर झालेल्या मुलीला वाचविण्यासाठी मानवी शरीरातील आवश्यक असणारा घटक मिळविण्यासाठी त्याची होणारी फरफट डोळय़ासमोर उभी राहते. प्रभावी पण खर्चिक असलेल्या या उपचार पद्धतीने जवळच्या व्यक्तीवर उपचार करताना अजूनही रुग्णाच्या नातलगांना मूळ पेशी दात्यांचा शोध घ्यावा लागतो. स्टेम सेल्स या केवळ मानवी शरीरात अस्थिमेदामध्येच आढळतात. या पेशींच्या सहाय्याने रुग्णाच्या शरीरात लाल पेशी, श्‍वेत रक्तपेशी आणि प्लेटलेट्सची निर्मिती करता येते. दाते आणि ग्राहक यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव तसेच दात्यांचा अभाव यामुळे कर्करोग झालेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकत नाहीत. काही खासगी रुग्णालयांमध्ये स्टेम सेल्स थेरपीसाठी लाखो रुपयांची आकारणीदेखील केली जाते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 'नॅशनल हेल्थ मिशन'च्या माध्यमातून आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (एम्स)च्या मदतीने रुग्ण आणि 'स्टेम सेल्स'दात्यांची अधिकृत माहिती एकत्रित करण्याचे आरोग्य मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. स्टेम सेल्स दात्यांची यादी तयार झाल्यानंतर आवश्यकतेच्यावेळी इच्छुक दात्यांशी संपर्क साधणे शक्य होणार आहे.