गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित

By Admin | Updated: June 20, 2014 21:57 IST2014-06-20T21:24:51+5:302014-06-20T21:57:48+5:30

दानापूर-चांगलवाडी शिवारातील अनेक गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित; गारपीटग्रस्ताचे निवेदन

Harvested farmers are deprived of subsidy | गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित

गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित

दानापूर(अकोला) : दानापूर-चांगलवाडी शिवारातील अनेक गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले असून, त्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन दिले आहे. दानापूर-चांगलवाडी शिवारातील शेतकर्‍यांना गारपिटीने चांगले झोडपल्याने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अधिकार्‍यांच्या कामचुकार प्रवृत्तीने काही शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे. गारपिटीने झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून शेतकर्‍यांनी प्रथम तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन दिले; परंतु कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्या गेल्यामुळे १५ शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना भेटून गारपीटग्रस्तांना अनुदान मिळावे, याकरिता निवेदन दिले. त्यामध्ये नलुताई वाकोडे, देवीदास कतोरे, सुमेध वाकोडे, शे. किस्मत शे. शफी, राजेश खोडे, डिगांबर हागे, गजानन हागे, दादाराव वाकोडे, बळीराम वाकोडे, नरहरी हागे, रमेश गळस्कार, संघपाल वाकोडे, सदाशिव तळोकार, प्रमोद राऊत आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Harvested farmers are deprived of subsidy