शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रिटर्न सादर करण्यात हात आखडता

By admin | Updated: July 11, 2014 01:26 IST

केवळ दोन हजार व्यावसायिकांचे विवरण जमा

अकोला: महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर जमा करणार्‍या नोंदणीधारक उद्योजक, व्यावसायिकांनी एलबीटीचे पुनर्मूल्यांकन करीत ३0 जूनपर्यंत ह्यविवरणह्ण (रिटर्न) सादर करणे क्रमप्राप्त होते. आजपर्यंत ५ हजार ३६१ नोंदणीधारक व्यावसायिकांपैकी अवघ्या दोन हजार व्यावसायिकांनी मनपाकडे रिटर्न सादर केले. उशिरा रिटर्न सादर करणार्‍या व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत.महापालिका क्षेत्रात ६ सप्टेंबर २0१३ पासून जकातऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आला. स्थानिक संस्था कर जमा करणार्‍या संबंधित व्यापारी, उद्योजक यांनी वर्षभरात आयात केलेल्या सर्व मालाचे मूल्य १ लाख रुपयांपेक्षा कमी नसणे गरजेचे असून, वर्षभरात त्यांच्या विक्रीची अथवा खरेदीची उलाढाल ही ५ लाख रुपयांपेक्षा कमी नसणे आवश्यक आहे. या दोन अटींची पूर्तता करणार्‍या व्यापार्‍यांनी एलबीटीसाठी नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. महापालिका प्रशासनाकडे व्हॅटधारकांसह ५ हजार ३६१ व्यावसायिकांची नोंदणी आहे. प्रशासनाने ७ सप्टेंबर ते ३१ मार्चपर्यंतचे एलबीटीच्या पुनर्मूल्यांकनाला सुरुवात केली. त्यानुसार एलबीटीची नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना नोटीस देण्यात आल्या.व्यावसायिकांनी ३0 जूनपर्यंत ३१ मार्चपर्यंंतच्या व्यवहाराची (रिटर्न) माहिती मनपाकडे सादर करणे भाग होते. आजपर्यंत केवळ २ हजार व्यावसायिकांनी विवरण सादर केले. उर्वरित व्यावसायिकांनी अद्यापही विवरण सादर न केल्याने प्रशासन दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती आहे.