शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपगेटर’ अँप ठरणार पर्यटकांसाठी मार्गदर्शक

By admin | Updated: January 1, 2015 01:54 IST

भ्रमंती करणा-यांसाठी पर्यटन मंत्रालयाचे तयार केले मोबाईल अँप.

राम देशपांड/ अकोला : भारतात पर्यटनासाठी येणार्‍या देश-विदेशातील पर्यटकांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करून पर्यटन मंत्रालयाने इन्क्रेडिबल इंडियाच्या मदतीने ह्यट्रिपगेटरह्ण अँप विकसित केले आहे. देशांतर्गत भ्रमंती करणार्‍या पर्यटकांना हे अँप मार्गदर्शक ठरणार असल्याचा दावा पर्यटन मंत्रालयाचा आहे.भारतात पर्यटनाला येण्यापूर्वी आवश्यक ती सर्व माहिती शोधून काढण्याचे काम पर्यटकांना करावे लागते. विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून आवश्यक माहिती हाती पडतेच असे होत नाही. देश विदेशातील पर्यटकांच्या सर्व गरजा ओळखून त्यांचे खर्‍या अर्थाने समाधान व्हावे या उद्देशाने अँन्ड्रॉईड मोबाईलवर वापरता येईल असे ह्यट्रिपगेटरह्ण अँप आहे. या अँपमुळे पर्यटकांना हॉटेल, विमान, रेल्वे, पर्यटन स्थळे आदिंची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.सद्या देशात पर्यटनाबाबत माहिती देणारे काही अँप अस्तित्वात असले तरी, त्यावर माहिती शोधण्यास पर्यटकांना बराच वेळ खर्ची घालावा लागतो. एवढा वेळ घालवून देखील पाहिजे ती माहिती उपलब्ध होत नाही. पर्यटकांना आता ही माहीती ट्रिपगेटर डॉट कॉम व इन्क्रेडिबल इंडियाच्या अँपवर मिळेल. या अँपवर देशातील प्रत्येक प्रसिद्ध पर्यटनस्थळासह जवळपासच्या पर्यटनस्थळे तसेच एटीएम, पेट्रोलपंप, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच वैद्यकीय सुविधांची देखील माहिती पुरविण्यात आली आहे. याशिवाय हॉटेल्स, रेस्टॉरेंट मधील खाद्यपदार्थांचे दर देण्यात आले असल्याने पर्यटकांना परवडणारे हॉटेल आणि रेस्टॉरेंट फक्त एका क्लिकवर शोधता येणार आहे. हे अँप केवळ माहिती देणारे असून, या माध्यमातून कोणताही व्यवहार केला जाणार नसल्याचे पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.