शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

धान्य, फळे, भाजीपाला आता अल्पावधीतच वाळणार!

By admin | Updated: February 18, 2017 03:24 IST

डॉ. पंदेकृविने तयार केले ‘सोलर ड्रायर’ तंत्रज्ञान

राजरत्न सिरसाटअकोला, दि. १७- सौर ऊर्जा वापरून धान्य, फळे तसेच भाजीपाला अल्पावधीतच वाळण्यासाठीचे तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. हे ह्यसोलर ड्रायरह्ण (सोलर शुष्कक) तंत्रज्ञान असून, वाळविताना भाजीपाला, फळांची गुणवत्ता कायम राहत असल्याने या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात येत आहे.देशात मुबलक सौर ऊर्जा उपलब्ध आहे. त्याचा उपयोग धान्य, फळे व भाजीपाला वाळविण्यासाठी करता येतो. सौर शुष्कक वापरल्यास पदार्थातील पोषण, तत्त्वे, चव, रंग आणि गुणवत्ता कायम राहते. तसेच कमीत, कमी वेळेत सुकवता, तर येतेच शिवाय जास्त काळ टिकवून ठेवता येत असल्याने या तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. याकरिता कृषी विद्यापीठाने सोलर शुष्ककचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखविण्यात येत आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभागाने अकोला येथे अर्धगोलाकार आकाराचे शुष्कक विकसित केले आहे. या सौर शुष्ककाची उत्पादन वाळविण्याची क्षमता १00 किलो एवढी आहे. यामध्ये औषधी वनस्पती, सफेद मुसळी, पानपिंपरी, हळद, मिरची, तसेच आवळा कॅन्डी, बटाटे चिप्स, हिरवा भाजीपाला इत्यादी वाळविण्यासाठी शुष्ककाचा वापर केल्यास पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत फायदेशीर आहे.कृषी विद्यापीठात अर्ध दंडगोलाकार शुष्कक बनविण्यात आला असून, यावर पाईपचे सांगाडे लावले आहे. त्याला अल्ट्राव्हायलेट पॉलीथिलीन फिल्मने झाकली आहे. या शुष्ककामध्ये दिवसा हरितगृह परिणामामुळे आतील तापमानात वाढ होते. आतील तापमान हे वातावरणातील तापमानापेक्षा १५ ते २0डिग्री से. अधिक राहते.व दुपारी १२ ते २ या वेळेत ते ६0 ते ६५ डीग्री से. पर्यंत पोहोचते. जमिनीलगतचा पृष्ठभाग सिमेंट काँक्रीटचा बनवलेला आहे. त्यावर काळा रंग दिलेला आहे. काळ्य़ा रंगाच्या गुणधर्मानुसार १00 टक्के उष्णता शोषून घेतली जाते. त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते. शुष्ककातील वाढलेल्या तापमानामुळे व गरम हवेच्या प्रवाहामुळे धान्य, भाजीपाला तसेच फळे लवकर वाळण्यास मदत होते. या शुष्ककातील गरम हवा व अतिनील किरणामुळे पदार्थातील आद्र्रता कमी होऊन पदार्थ वाळतात. विशेष म्हणजे यावर पावसाचा तेवढा परणिाम होत नाही. गृहोद्योग, कृषी उद्योगाकरिता या तंत्रज्ञानाचा उत्तम फायदा होणार आहे.पारंपरिक पद्धतीत पदार्थावर धूळ बसते, पक्षी, प्राण्यांची विष्ठा पडते व वाळण्यास बराच वेळ लागतो. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात येत आहे.-

सोलर शुष्कक तंत्रज्ञान किफायतशीर असून, गृह, कृषी उद्योग उभारण्यासाठी फायदेशीर आहे. शेतकर्‍यांना हे तंत्रज्ञान बघण्यासाठी खुले आहे.- डॉ. सुरेंद्र काळबांडे,संशोधन अभियंता,नवीकरणीय ऊर्जा स्रोत व विद्युत अभियांत्रिकी,डॉ. पंदेकृवि,अकोला.